Breaking News

सकारात्मक दृष्टिकोन व समान न्यायाची भूमिका असेल - वर्षा पाटोळे ; नूतन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांचे पत्रकारांकडून स्वागत

जिल्हा माहिती अधिकारी म्हणून वर्षा पाटोळे यांचे संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने स्वागत करताना अध्यक्ष गोरख तावरे

    New District Information Officer Varsha Patole welcomed by journalists

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काम करण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी म्हणून काम करताना सकारात्मक दृष्टिकोन व सर्वांना समान न्यायाची भूमिका असेल असे मत जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

    सातारा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून वर्षा पाटोळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्यावतीने अध्यक्ष गोरख तावरे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी माहिती अधिकारी विजयकुमार चव्हाण, दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड.रोहित अहिवळे, दैनिक लक्ष्मीपुत्रचे संपादक सुलतान फकीर उपस्थित होते. दरम्यान दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड.रोहित अहिवळे यांनी माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांचे पुस्तक व अंक देऊन अभिनंदन केले. 

जिल्हा माहिती अधिकारी म्हणून वर्षा पाटोळे यांचे स्वागत करताना  दैनिक गंधवार्ताचे संपादक ॲड.रोहित अहिवळे
    प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करताना तेथील अनुभव अतिशय चांगला व वैचारिक प्रकल्प करणारा आहे. अनेकांशी सुसंवाद साधून राज्य शासनाच्या योजना आणि प्रशासकीय बातम्या व मंत्री महोदयांचे कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीला सर्व माध्यमानी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशाच पद्धतीचा प्रतिसाद व सहकार्य क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यातील माध्यमांकडून मिळेल असा विश्वासही वर्षा पाटोळे यांनी व्यक्त केला.

No comments