निरा देवघर : फलटण ते माळशिरस मुख्य बंदिस्त नलिकेच्या पहिल्या टप्प्याचे प्रकल्पाच्या निविदा प्रसिद्ध - खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ जुलै - फलटण - माळशिरस - सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा देवघर प्रकल्प मागील ४० वर्षे झाली रखडला आहे. या तालुक्याच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी राजकारण केले आहे. अगदी मृतप्राय झालेल्या या योजनेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवसंजीवनी दिली. फक्त मान्यताच नाही तर निधीही दिला. आज त्यांच्या वाढिवसानिमित्त या योजनेचे टेंडर प्रकाशित करून, माढा लोकसभेतील जनतेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानावेत व या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात म्हणून आजच्या दिवशी टेंडर प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
निरा देवघर या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या मुख्य वितरण व्यवस्थेच्या कॅनॉलची निविदा आज प्रसिद्ध झाली. या कामासाठी एकुण २९५० कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे किमी ६६ ते ७६ चे २३५ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. त्यामुळे या वर्षाखेरपर्यंत माळशिरसच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले जाणार आहे. या कालव्यामुळे खंडाळा - फलटण - माळशिरस व पंढरपूर -सांगोल्यातील काही भागाला पाणी उपलब्ध होऊन, या भागाचा कायमस्वरूपीचा दुष्काळ संपणार आहे. या तिन्ही तालुक्यातील गावातील लोकांना याचा फायदा होईल. माझ्या व मतदार संघाच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी दुष्काळ संपवण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील गावाना याचा लाभ होणार आहे. गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. परंतु मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळाचा विषय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून, बैठका घेऊन, यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन, आज निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही. खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन भिजवण्याचे स्वप्न मी पाहिलं होतं, ते आज राज्य सरकारने पूर्ण केले. त्याचा आम्हाला आनंद होत आहे. या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहाणार आहे. भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही. स्वतःचे शेतीबरोबरच व्यवसाय सुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील हरितक्रांती बरोबरच आर्थिक क्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर शेती बरोबर च युवकांचे हाताला काम मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आले खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.
No comments