Breaking News

एक रुपयात पीक विमा योजनेला 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

One rupee crop insurance scheme extended till August 3

    सातारा - सातारा जिल्हयातील 1 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. पीक विमा पोर्टल व नेटवर्कच्या अडचणीमुळे राज्य शासनाने पीक विमा भरण्यासाठीच्या मुदतीत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास दिला होता, त्यास मंजूरी मिळून आता एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत वाढून ३ ऑगस्ट 2023 झाली आहे.

            सातारा जिल्हयामध्ये सरासरी च्या 40% पाऊस झाला आहे. हंगामातील अपूरा पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीमुळे विमा संरक्षण दिले जाते.

विमा कोठे भरावा :  जिल्हयातील सर्व CSC केंद्र / महा ई सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र. सर्व राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक.  शेतकरी विमा संरक्षणासाठी वेब पोर्टलद्वारे थेट अर्ज करु शकतील त्यासाठी पिक विमा पार्टलवर. सातारा जिल्हयासाठीची ओरिएन्टल इन्शुरन्स ही विमा कंपनी असून विमा कंपनीचा टोल फ्री नंबर: १८००११८४८५ असा आहे.  
            एक रुपया विमा हप्ता मध्ये पुढीलप्रमाणे मिळणार विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी पिक व संरक्षित रक्कम-  भात (तांदुळ) 41 हजार रुपये, ज्वारीसाठी 20 हजार रुपये, बाजरीसाठी 18 हजार रुपये, नाचणीसाठी 20 हजार रुपये, भूईमूगकरिता 40 हजार रुपये, सोयाबीन 32 हजार रुपये, मूग  25 हजार आठशे सतरा रुपये उडीद, 26 हजार रुपये, कांदा 46 हजार रुपये आहे.
             सर्व शेतकऱ्यांनी एक रुपया भरून विमा योजनेत नोंदणी करावी. आजच्या पावसाच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पिकांच्या उत्पादनात घट आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. पिक विमा भरल्यावर अपुरा पाऊस, पावसाचा खंड इत्यादी कारणांमुळे पिकांचे होणारे नुकसानी पोटी पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळू शकते. पिक विमा भरण्याची मुदत वाढून 3 ऑगस्ट झाली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकरी विजय माईनकर यांनी केले आहे.
 

No comments