Breaking News

सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धा 2023-24 चे आयोजन

Organizing Subroto Mukherjee Cup Football Sports Tournament 2023-24

     सातारा - सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2023-24 या वर्षातील राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर ते 23 ऑक्टोंबर, 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यावतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेतील 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुले/मुली या वयोगटांचे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे दिनांक 01 ऑगस्ट, 2023 पासून करण्यात येणार आहे.   
             ज्या शाळा/महाविद्यालयांना सदर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायच्या आहे. त्यांनी आपला प्रवेश अर्ज मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने दिनांक 28 जुलै, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करणे आवश्यक आहे. तद्नंतर येणा-या प्रवेश अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. तसेच सुब्रतो मुखर्जी कप फूटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणा-याकरिता खेळाडूची जन्मतारीख खालीलप्रमाणे असावी.
            सुब्रतो मुखर्जी 14 वर्षाखालील मुले इ. 6 वी व त्यापुढिल दिनांक 01 जानेवारी 2010 अथवा त्यानंतरचा तसेच 17 वर्षाखालील मुले व मुली त्या पूढील दिनांक 01 जानेवारी 2007 अथवा त्यानंतर जन्मलेले असावेत.
         तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा/महाविद्यालयांनी सहभागी व्हावे; असे आवाहन श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. सुमित पाटील, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी 8793424444 या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments