मिळकतधारकांनी मोकळ्या जागा स्वच्छ कराव्यात - संजय गायकवाड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.2 जुलै- शहरामध्ये डेंगु सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये याकरिता खबरदारी म्हणून शहरातील मिळकतीतील, मोकळ्या जागेमधील झाडे झुडपे व अस्वच्छता, त्या त्या मिळकतधारकांनी स्वच्छ करून घेण्याचे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
फलटण शहरातील तमाम मिळकतधारक, मोकळी जागा मालक / भोगवटादार / धारक यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २४० अन्वये सूचीत करणेत येते की, शहरामध्ये डेंगु सदृश्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून आपल्या मिळकतीतील / मोकळया जागेमधील अस्वच्छता, झाडी झुडपे, राडारोडा इ. ज्यामुळे रोगराई पसरु शकते, याबाबी आपण तात्काळ पाहुन घ्याव्यात व परीसर स्वच्छ करुन घ्यावा असे आवाहन करून, ज्या मिळकतधारकांमार्फत स्वच्छता केली जाणार नाही, त्या मिळकतीतील / मोकळया जागेमधील सर्व बाबी नगर परिषदे मार्फत काढूण घेण्यात येतील व सदर कामी जो खर्च येईल तो, खर्च संबंधीत मालक / धारक यांच्याकडून मालमत्ता करा सोबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३२८ अन्वये वसुल करणेत येईल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रशासकीय अधिकारी संजय गायकवाड यांनी दिला आहे.
No comments