प्रॉग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे येथे पालखी दिंडी सोहळा उत्साहात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जुलै - सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रॉग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे येथे आषाढी पालखी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर', अशा विठ्ठलमय वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला होता. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ऋषी व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गुणवरेच्या प्रॉग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा रूक्मिणी तर कोणी संत बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावरून पालखी सोहळा गुणवरे गावात आला. पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखिल इथे आयोजित करण्यात आले होते, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
यावेळी या कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू मा. उत्तम चव्हाण, कृषी अधिकारी मा. श्री. दिलीप पवार, रामराजे मोटार वाहतूक संघटनेचे चेअमन व भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन मा. श्री. शिवाजी लंगुटे, मुंजवडी गावचे ग्रामसेवक मा. श्री. विलास डंगाने, खुंट्याचे माजी केंद्रप्रमुख मा. श्री. सुभेदार डूबल, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. श्री. पांडुरंग पवार, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. विशाल पवार, मा. सौ. सुलोचना पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका. सौ. प्रियांका पवार, प्रॉग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. किरण भोसले, समन्वयिका मा. सौ. सुप्रिया सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवराच्या हस्ते माऊलीच्या पालखीची पूजा व आरती करण्यात आली. इयत्ता एल. के. जी. ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अभंग सादर केले. इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांनी हरिपाठ सादर केला. इयत्ता 6 वी तील आदित्य कदम या विद्यार्थ्याने उत्कृष्ट असे कीर्तन सांगितले. इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, यावर सुंदर नाटिका सादर केली. इयत्ता 7 वी व 8 वी तील विद्यार्थ्यांनी डान्स सादर केला. पालकांनी भरभरून विद्यार्थ्याचे कौतुक केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भैरवनाथ विकास सोसायटी व जय हनुमान विकास सोसायटी यांच्यातर्फे श्रीफळ देऊन संस्थेचे सचिव विशाल पवार यांचा सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया सपकाळ व सौ. निकिता मुळीक यांनी व आभार प्रदर्शन सौ. उषा आडके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. अशा प्रकारे आषाढी पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
No comments