Breaking News

फलटण एज्युकेशन सोसायटी तर्फे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न

Phaltan Education Society completed tree planting program

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीमंत रामराजे नाईक निबाळकर माजी विधान परिषद सभापती, महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानुसार  व सातारा जिल्हा परिषदेचे माजी  अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे त्या अंतर्गत फलटण एज्युकेशन, सोसायटी फलटण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण  यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील मौजे मांडवखडक, सस्तेवाडी, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण या ठिकाणी विविध प्रकारच्या एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली त्यामध्ये महोगणी, बहावा, काटेसावर, चिंच, खैर, कडुनिंब, वड, सीसो, कांचन, करंज इ. वृक्षांचा समावेश आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अधक्ष्य, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, सेक्रेटरी- फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण श्री शरदराव रणवरे, व्हा.चेअरमन, महाविद्यालय समिती, रणजित निंबाळकर, सदस्य महाविद्यालयीन समिती, अरविंद निकम, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, डॉ. एस. डी. निंबाळकर प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण,  राजेंद्र पवार अधीक्षक, शेती विभाग, प्रा. ए. डी. पाटील, प्रा. ए. एम. घनवट, दोन्ही महावि्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी. तरटे व प्रा. एम.एस. बीचुकले आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक उपस्थित होते.

No comments