Breaking News

झाडे लावणे आपल्या भविष्याच्या दृष्टीने गरजेचे - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

वृक्षारोपण करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समवेत आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
Planting trees is essential for our future - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    गंधवार्ता (गंधवार्ता वृत्तसेवा) - जागतिक तापमान वाढ आणि त्यातून निर्माण होणारी अनेक संकटे टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे असल्याचे सांगून, बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप, सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून शहरात वृक्षारोपण मोहिम सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या सर्वांना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी धन्यवाद दिले, त्यांचे कौतुक केले.

वृक्षारोपण करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर समवेत डॉ. बर्वे, डॉ. संजय राऊत, महादेव माने, प्राचार्य गंगावणे

         माझी वसुंधरा अभियान आणि  जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. महेश बर्वे यांनी फलटण शहर व तालुक्यात एकाच दिवशी - एकाच वेळी एक लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवून आपला गाव वृक्षोत्सव आणि हर घर झाड उपक्रमांतर्गत केलेल्या आवाहनानुसार बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांनी संयुक्तरित्या विमानतळ व न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले, त्याचा शुभारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, त्यावेळी आ. दिपक चव्हाण,  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संचालक महादेव माने, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, राम नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशन माजी अध्यक्ष रणधीर भोईटे, बिल्डर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, विक्रम शेठ झांजुर्णे, महेश गरवालिया,  बिल्डर असोसिएशन विद्यमान अध्यक्ष किरण दंडीले, उपाध्यक्ष सुनील सस्ते, सचिव स्वीकार मेहता, खजिनदार संजय डोईफोडे, दिलीप शिंदे, राजीव नाईक निंबाळकर, डॉ. महेश बर्वे, कुमार भट्टड,  मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाळासाहेब गंगावणे,  उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, सामाजिक वनीकरणचे दिगंबर जाधव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी/विद्यार्थीनी आणि फलटण शहर वासीयांची  उपस्थिती होती.

    आगामी काळात सर्वांनी वृक्षारोपण  व वृक्ष संवर्धनाची ही मोहिम फलटण शहर व तालुक्यात प्रभावी रीतीने राबवावी, त्यामध्ये तरुण आणि महिलांसह विद्यार्थी/विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन फलटण हा सर्वाधिक वृक्ष लागवड असलेला तालुका बनवावा असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी  केले.

    तापमान वाढीमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देताना आपल्या भागातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जून पासून सुरु होणारा पाऊस आता जुलै महिन्याची ११ तारीख आली तरी धरण क्षेत्रात अद्याप दमदार पावसाला सुरुवात नाही, कोठेही २/३ मि. मी. पेक्षा अधिक पाऊस झाला नाही, परिणामी पाणी टंचाई समस्या निर्माण झाली असून आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु झाले आहेत, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे या बाबी लक्षात घेऊन प्रत्येकाने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करावेत असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

    जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून फलटण शहर व तालुक्यात १ लाख झाडे लावण्याचा विविध संस्था/संघटनांचा निर्धार निश्चित उपयुक्त आहे, ग्रामस्थांनी त्यांना उत्तम साथ केल्याचे चित्र प्रेरणादायी असल्याचे सांगताना १ लाखापेक्षा अधिक झाडे लावता आली असती तथापि पावसाने ओढ दिल्याने आगामी काळात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ही मोहिम अधिक प्रभावी करता येईल असे प्रतिपादन आ. दिपकराव चव्हाण यांनी केले.

जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावा - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

       जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्याची संकल्पना घेऊन डॉ. महेश बर्वे यांनी गेला सुमारे महिनाभर समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सर्वांना आपला गाव वृक्षोत्सव आणि हर घर झाड संकल्पना समजावून दिली असल्याने आज शहर आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होत असल्याचे निदर्शनास आणून देत शहरातील खुल्या जागा, शासकीय कार्यालय परिसर, गृहनिर्माण सोसायट्या परिसर येथे शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

     ग्लोबल वॉर्मिगच्या प्रश्नात आ. श्रीमंत रामराजे यांनी प्रचंड अभ्यास केला आहे, त्याबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी त्यांनी लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या माध्यमातून येथे परिषदा घेतल्या, त्या क्षेत्रातील तज्ञांना येथे निमंत्रित करुन येथील संस्था, संघटना पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी, प्राध्यापक यांना या विषयाचे गांभीर्य समजावून देत बिघडलेला पर्यावरणाचा समतोल सुधारण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनावर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले, त्यातून फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

    आपला गाव वृक्षोत्सव आणि हर घर झाड संकल्पनेला फलटण शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने एकाच दिवशी, एका वेळी सर्व स्तरावर वृक्षारोपण करण्याची आपली योजना यशस्वी झाल्याचे सांगत गोविंद फौंडेशन, बिल्डर्स असोसिएशन, क्रेडाई, मुधोजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, मुधोजी महाविद्यालय, डॉक्टर्स असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, लायन्स ग्रुप, जायंटस ग्रुप, मुधोजी क्लब, तालुक्यातील सहकारी संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था वगैरे विविध समाज घटकांनी आजच्या या उपक्रमात सहभागी होऊन उत्स्फूर्त साथ केल्याचे सांगत डॉ. महेश बर्वे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

     जागतिक लोकसंख्या दिनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आ. श्रीमंत रामराजे  नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला असून फलटण हे वृक्षारोपण क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावे यासाठी सर्वांनी यापुढेही अशीच साथ करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉ. महेश बर्वे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

    बिल्डर्स असोसिएशन, वॉकर्स ग्रुप आणि सगुणामाता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त सहभागाने आज विमानतळ परिसरातील प्रशस्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला, न्यायालय परिसरात सुमारे ३५० झाडे लावण्यात आली असून त्यांना ट्री गार्ड आणि ठिबक सिंचन द्वारे कायम स्वरुपी पाण्याची सोय करण्यात येत असल्याचे प्रमोद निंबाळकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

No comments