Breaking News

साखरवाडी येथे ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

 

Police action on online gambling den at Sakhrwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - साखरवाडी तालुका फलटण येथे ऑनलाइन जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांना कारवाई करून,  रोख रक्कम व ऑनलाईन जुगाराचे साहीत्य असा एकूण २३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

    दि.२६/०७/२०२३ रोजी श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांना मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी तात्काळ पुढील कारवाई करीता सहा पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या, त्यानुसार साखरवाडी येथे चालू असलेल्या ऑनलाईन जुगारावर सहा. पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, महीला पोलीस उपनिरीक्षक स्वाती घोंगडे मॅडम, सहा. पोलीस उपनिरीक्षक हांगे, पो को  देशमुख, म.पो.कॉ. पठाण, होमगार्ड बोडरे या पथकाने साखरवाडी गावचे हददीत चांदणी चौक येथे हॉटेल वृषभ या इमारतीच्या गाळयात इसम नामे राजेंद्र ज्ञानदेव पवार रा. साखरवाडी ता. फलटण हा बेकायदेशीर संगणकावर ऑनलाईन लॉटरी लोकांकडून पैसे घेवून, जुगाराचा व्यवसाय करीत असताना, मिळून आला असून, त्यांच्या कब्जात रोख रक्कम व ऑनलाईन जुगाराचे साहीत्य असा एकूण २३,३६०/- रूपयेचा मुदद्देमाल मिळून आला असून सदरबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे हे करीत आहेत.

No comments