Breaking News

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा ; स्वच्छता व फवारणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा

Provision should be made for stray dogs; Congress has warned that cleaning and spraying should be done otherwise there will be a strong agitation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे तसेच काही ठिकाणी स्वच्छता, साफसफाई ची कामे वेळेवर झाली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यात मच्छर वाढले आहेत त्यामुळे आजारपणात वाढ झाली आहे. त्यासाठी स्वच्छता अभियान चालू करून फवारणी करावी अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस फलटणच्या वतीने नगरपरिषदच्या उपमुख्याधिकारी श्रीमती वर्षा बडदरे,कार्यालय अधिक्षक श्री. मुस्ताक महात यांना निवेदन देऊन करण्यात आली. तसेच वरील समस्या बाबतीत तातडीने उपाय योजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

    याप्रसंगी नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन देतांना फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सुर्यवंशी (बेडके), शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री. पंकज पवार,तालुका कार्याध्यक्ष श्री. अमिरभाई शेख,जिल्हा अनूसुचित जाती सेलचे उपाध्यक्ष श्री.सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष श्री. ताजुद्दिन बागवान,शहर अध्यक्ष श्री. अल्ताफभाई पठाण उपस्थित होते.

No comments