Breaking News

बौद्ध समाजाच्या जमीनीवर जबरदस्तीने घेतलेला ताबा व अतिक्रमणे हटवून मुळ मालकांना जमिनी परत द्या - कामगार संघर्ष संघटना

Return lands to original owners by removing forced possession and encroachments on the lands of the Buddhist community - Kamgar Sangharsh Sanghatna

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ जुलै  उपळवे, ता. फलटण  येथील महारवतन जमीनीवर जबरदस्तीने घेतलेला ताबा व अतिक्रमणे  हटवून मुळ मालकांना जमिनी परत द्याव्यात व  सुरेश गंगाराम लांभते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने, फलटण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

    कामगार संघर्ष संघटनेकडून, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील उपळवे, दालवडी, वाठार निंबाळकर, विंचुर्णी, नांदल, सोमंथळी, सस्तेवाडी, सांगवी, सुरवडी, काळज, मुंजवडी, राजुरी, कुरवली बु. जिंती, साखरवाडी, रावडी, व इतर ठिकाणी सलेल्या महार वतनी जमीनी जबरदस्तीने, सावकारी, फसवणुक करुन खंडाने घेतलेल्या होत्या, त्या जमीनी मुळ मालकांना परत देण्यात याव्या.

    सदरील अतिक्रमणे करणारे हे आपल्या धाकदपटशाहीने, दहशतीने, गुंडप्रवृत्तीने तसेच आपल्या प्रशासकीय व शासकीय पदाचा गैरवापर करुन, बंदुक दाखवुन सुरेश गंगाराम लांभते याने अतिक्रमणे केलेले आहे व उपळवे येथील महार वतनाच्या शेत जमिनीत कोट्यावधीचे फार्म हाऊस बांधुन बाजुने तारकंपाऊंड करुन, जमिनीच्या मालकांनाच गावा बाहेर हाकलुन, स्वतः जमीन हस्तगती केलेल्या आहेत. अश्या जातीयवादी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

    तसेच यातील काहिजन जबरदस्तीने जमीनी बळकावणारे, प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर आहेत, त्यांची खाते निहाय चौकशी करुन, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करुन, मालमत्ता जप्त करण्यात यावी व अनु.जाती,अनु.जमाती प्रतिबंधक सुधारित कायदा २०१५ च्या कलम ३ (१) ऐफ, व ईतर गुन्हे दाखल करण्यात यावा व ज्या त्या महारवतनी जमीनीच्या मालकांना जमिनी परत करण्यात याव्यात.

    अन्यथा या घटणेचे महाराष्ट्रभर पडसाद पडल्या शिवाय राहाणार नाही. या महारवतनी जमीनीच्या समाजातील लोकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण, अमरण उपोषण, रास्ता रोको, घंटानाद, सामुहिक आत्मदहन आश्या वेगवेगळ्यापध्दतीचे आंदोलने छेडण्यात येतील. तसेच कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने दखल घ्यावी. व महारवतनी जमनीच्या वंचित दुर्बल घटकातील लोकांच्या अभिनंदनास पात्र रहावे. अशी आपेक्षा करतो. येत्या ५ दिवसात जर चौकशी केली नाही तर, आपल्या कार्यालया बाहेर कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने लक्षनीय उपोषण करण्यात येईल त्याच बरोबर उपळवे येथील गट क्र. २२ मधील अवैध्य बांधकाम केले आहे, ते ताबोडतोब पाडण्यात यावे आणी त्याची चौकशी करण्यात यावी तसेच अनेक वर्षांपासून जे या कुटुंबाचे नुकसान झाले आहे ते सुद्धा परत करण्यात यावे.

No comments