Breaking News

संकेत कुमार भांडवलकर यांची मंत्रालय लेखनिक पदी निवड

Selection of Sanket Kumar Budrukar as Ministry Secretary

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरीब परिस्थितीतून संघर्ष करण्याची हिम्मत ठेवून, आपले ध्येय निश्चित करून, स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती संकेत कुमार भांडवलकर यांनी २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत मंत्रालय लेखनिक पद यशस्वीपणे प्राप्त केले. 

    संकेत कुमार भांडवलकर यांच्या या यशाबद्दल माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, शाहूजी मदने यांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, जिवलग मित्र, कुटुंबीय आई वडील, आजी यांच्याकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments