Breaking News

जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 मुदत ऑगस्ट

The deadline for payment of entry fee for organizing various competitions through the office of District Sports Magistrate is August 25

    सातारा - जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत  सन 2023-24 या वर्षातील तालुका,जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धत सहभागी होणाऱ्या खेळाडू,क्रीडा शिक्षक यांना तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, स्पर्धचे स्थळ, खेळाडू नोंदणी, प्रवेश शुल्क भरणे, स्पर्धाच्या पत्रिका इ. बाबतची माहिती देण्यासाठी http://dsosatara.co.in/school/index.php वेबासाईट तयार करण्यात आलेली आहे, स्पर्धेत सहभागासाठी ऑन-लाईन प्रवेश नोंदणी सुरू असून प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 अशी आहे.    
    यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात येत असून बैठकांमध्ये स्पर्धा आयोजनाची नियमावली, तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतची स्थळे व आयोजनास इच्छुक संस्था, शाळा, तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्राथमिक प्रवेशिक ऑन- लाईन कार्यवाही, स्पर्धा आयोजन खर्चाबाबत माहिती, चर्चा व अडचणी ,अल्पसंख्यांक खेळाडूंचा सहभाग वाढविणेबाबत उपाययोजना यावर चर्चा करण्यात येणार आहे.
            या वर्षाच्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धातून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व वातावरण मिळवून देण्याचा व त्यांची कारकीर्द पुढे उज्जवल करण्यासाठी आपण मिळून चांगले प्रयत्न करुन सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल होईल, अशी कामगिरी करावी. असे आवाहन करण्यात  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, क्रिडा विभाग यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

No comments