फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे विविध उपक्रम अविरत सुरु राहणार - श्रीरंग पवार ; संघाच्या अध्यक्षपदी सुभाष सोनवलकर यांची निवड
![]() |
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करताना मान्यवर |
फलटण - फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची एकजूट आणि त्यांच्या सहकार्याने संघटनेच्या विविध उपक्रमांची पुढील वाटचाल अविरत सुरु ठेवण्यास आपण सर्व सदस्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आपण संघटनेचे विविध उपक्रम मोठ्या जोमाने सुरु ठेवाल असा विश्वास संघटनेचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार यांनी व्यक्त केला.
कोरोना महामारी कालावधीत संघटनेचे खंडीत झालेले सर्व उपक्रम यापुढे सुरु ठेवण्यासाठी आणि नवीन कार्यकारिणी निवड करण्याच्या उद्देशाने फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक शिवसंदेशकार माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर पत्रकार भवन फलटण येथे रविवारी आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीरंग पवार बोलत होते. यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, संघाचे ज्येष्ठ सदस्य तथा माजी अध्यक्ष राजेंद्र भागवत, माजी अध्यक्ष नानासाहेब मुळीक, प्रदीप चव्हाण, आनंद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संघाच्या वाटचालीत आम्हा सर्व ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन सतत राहील याची ग्वाही देत नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांना सर्वोतोपरी सहकार्य राहील असे सांगून नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे श्रीरंग पवार यांनी अभिनंदन केले.
![]() |
नानिर्वाचीत पदाधिकारी - सुभाष सोनवलकर, सचिन निंबाळकर, अशोक सस्ते, संजय जामदार |
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. ऐक्य दुधेबावी वार्ताहर सुभाष सोनवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी साप्ताहिक स्वराजचे सचिन निंबाळकर, सचिवपदी दै. सकाळचे आसू वार्ताहर अशोक सस्ते, खजिनदार पदी दै. सकाळचे कोळकी प्रतिनिधी संजय जामदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रारंभी शिवसंदेशकार कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आनंद पवार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.
No comments