Breaking News

धुमाळवाडी गावाचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत १०० % सहभाग

100% participation of Dhumalwadi village in Pradhan Mantri Pik Bima Yojana

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - प्रधानमंत्री पीक विमा योजनेत धुमाळवाडी, ता. फलटण येथील ५९ शेतकऱ्यांनी ३२.८५ हेक्टर क्षेत्रातील कांदा व बाजरी पिकासाठी प्रत्येकी १ रुपया विमा हप्ता भरुन आपली पिके संरक्षीत केली असून येथील कांदा व बाजरी पिकाखालील संपूर्ण क्षेत्र विमा संरक्षीत झाले आहे. पीक विमा योजनेत सर्व प्रथम १०० % सहभाग नोंदविण्याचा बहुमान धुमाळवाडी गावाने पटकावला आहे.

    प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फलटण तालुक्यात प्रचार व प्रसिद्धीचे काम अगदी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्यांना पीक विमा योजनेची व्याप्ती, त्याची आवश्यकता आणि केवळ १ रुपया मध्ये हे उपलब्ध असल्याचे समजावून दिल्याने यावर्षी फलटण तालुक्यात विक्रमी पीक विमा नोंदणी झाली, त्यामध्ये धुमळवाडी गावाने १०० टक्के सहभाग घेतला.

     प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये या गावाचा १०० टक्के सहभाग व्हावा यासाठी कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी प्रचंड मेहनत घेऊन गावात पिक विमा बाबत मोठी जनजागृती केली.

    धुमाळवाडी, ता. फलटण या गावात फळपीकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या गावातील फळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत विक्रीसाठी जात आहेत.

No comments