माणकेश्वर मंदिराची सेवा करणे हे मी माझे भाग्य समजतो : श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - साधू संतांची तपोभूमी असणारे माणकेश्वर मंदिर हे पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराची उभारणी अतिशय आखीव रेखीव करण्यात आली आहे, तथापि या पुरातन मंदिराची झालेली पडझड दुरुस्त करुन रंगकाम केल्याने आता मंदिर सुशोभित झाल्याचे सांगताना या निमित्ताने माणकेश्वराची सेवा करता आली हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
बाणगंगा नदी काठी, शुक्रवार पेठेतील माणकेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या नामफलकाचे अनावरण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अलीकडच्या काळामध्ये मंदिराच्या काही भागाची पडझड झाल्याचे येथील कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे आपण ठरविले त्या पार्श्वभूमीवर मंदिराला संरक्षण असावे म्हणून संरक्षक कठडे बसवून काही ठिकाणी रेलिंग करुन या मंदिराची डागडुजी व रंगकाम करुन काही प्रमाणात जीर्णोद्धार केला. मंदिराचे काम सेवाभावी वृत्तीने करावे लागते आणि माणकेश्वर मंदिराची सेवा करणे हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
याप्रसंगी फलटण नगर परिषद उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोसले, आस्था टाइम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले, फलटण नगर परिषद माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषद माजी नगरसेविका सौ. प्रगतीताई कापसे आणि सुवर्णा खानविलकर, श्रीमंत संजीवराजे यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब कापसे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, रामराजे युवा मंच संस्थापक राहुल भैय्या निंबाळकर, अमरसिंह खानविलकर, विशाल तेली, तात्या तेली, कांताशेठ नाईक, सुधीर नाईक, विजय पालकर, आदेश देशमुख, बापू महामुनी, पप्पू मांढरे, शुक्रवार पेठ तालमीचे वस्ताद पै. राहुल सरक, फिरोज शेख, किशोरशेठ देशपांडे, अविनाश पवार, गोटूशेठ सुतार, हिंदुराव नाईक निंबाळकर, संजय कापसे, ओंकार गाढवे, वरुण अब्दागिरे आदी मान्यवरांसह शहरवासीय नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिरा समोर गणेशाचे सुंदर मंदिर आहे. माणकेश्वर महादेव मंदिराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिरात फलस्त ऋषीचे वास्तव्य होते, त्यामुळे या मंदिरात फलस्त ऋषी यांचे ध्यान मंदिर असून फलस्त ऋषींच्या वास्तव्यामुळे या शहराला फलटण असे नाव पडले आहे. या मंदिरातील पर्णकुटीत अनेक साधू महात्मे यांचे देखील वास्तव्य होते. विशेष करुन या मंदिरात सुंदर आखीव रेखीव नक्षीकाम असून या मंदिराच्या सभागृहामध्ये १६ दगडी खांब असून या खांबावर विविध शिल्प रेखाटलेली आहेत. मंदिराच्या बाहेर सुंदर अशा वीरगळी व लेणी पहावयास मिळतात. मंदिरामध्ये योगी शरणाजी महाराज यांचे शिष्य योगी संतोषनाथ महाराज यांनी १९९४ सालापासून या मंदिराची साफसफाई केली, मात्र आज या मंदिराची साफसफाई करण्याचे काम माणकेश्वर मंदिर तरुण मंडळ करीत असल्याचे पहावयास मिळते.
या कार्यक्रमाचे आयोजन पै. अभिजीत जानकर, फलटण नगर परिषद माजी नगरसेवक किशोर भैय्या निंबाळकर, पै. धनंजय निंबाळकर, पै. सनी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बापूराव आहेरराव, बापूराव देशमुख, पै. राहुल निंबाळकर, बंटी गायकवाड, भाऊसाहेब कापसे यांनी केले होते.
No comments