Breaking News

मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा - सामाजिक संघटनांची मागणी

A case should be registered against Manohar Bhide - demand of social organizations

    फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मनोहर भिडे वारंवार वादग्रस्थ व समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करत आहेत, तरी सुध्दा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही.  राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू  तसेच इतर महापुरूषांबद्दल तसेच विविध संत महात्मे यांच्या बद्दल वादग्रस्थ वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, त्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून  ताबडतोब योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जावी, अन्यथा मोठे जनअंदोलन उभारले जाईल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद  तसेच विविध सामाजिक संघटनाच्या  वतीने  देण्यात आला आहे.

    महात्मा फुले समता परिषद तसेच विविध सामाजिक संघटनाच्या वतीने या बाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी संचिन ढोले यांना देण्यात आले आहे .
    निवेदनात असे म्हटले आहे की, या पुर्वी मनोहर भिडे यांनी, अनेक वेळा समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केलेली आहेत व वारंवार करत आहेत, तरी त्यांच्यावर त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करून अटक करावी. 
    या वेळी  सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, तुकाराम गायकवाड,बाळासाहेब ननावरे, शरदराव कोल्हे, बापुराव शिंदे , गोविंदराव भुजबळ, विजय शिंदे , रणजित भुजबळ, विकास शिंदे ,दत्ता नाळे,सुभाष अभंग, नंदकुमार कचरे, अशोक शिंदे, शनैश शिंदे, प्रशांत शिंदे, माधव जमदाडे ,ताजुद्दीन बागवान , अमीर शेख, शेखर क्षीरसागर , नितेश भुजबळ , जालिंदर राऊत, ज्ञानेश्वर शिंदे , गणेश अडसुळ,  योगेश भुजबळ , प्रवीण फरांदे , अमोल शिंदे, प्रताप नाळे,स्वप्निल शिंदे , तुषार कर्णे, तुळशिराम शिंदे , तुषार नाळे, रोहन शिंदे ,योगेश शिंदे , अमोल शिंदे ,सनी रायकर, सचिन अभंग , शिवराज नाळे, किरण अबदागिरे, शुभम जाधव , तोशिफ आतार, अमोल मिसाळ, प्रशांत नाळे,गिरीष बनकर, प्रशांत ढावरे ,तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments