राजाळे येथे आंघोळीला गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - राजाळे येथील बारव मध्ये आंघोळीला गेलला एकजण पायऱ्यांवर पडल्याने, डोक्याला मार लागून, पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १०/८/२०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मौजे राजाळे गावच्या हद्दीतील बारव मध्ये, आंघोळीला गेलेल्या, जगन्नाथ पुरुषोत्तम गुरव वय ४० वर्ष, रा. राजाळे ता. फलटण हे पायऱ्यावर पडल्याने, डोक्यास मार लागून, पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची खबर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ओंबसे हे करीत आहेत.
No comments