आनंदाचा शिधा 1 ते 30 सप्टेंबर कालावधीत होणार वितरण
सातारा -शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्यादेय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना आगामी गौरी-गणपती उत्सव व तद्नंतर दिवाळी सणानिमित्त चार शिधा जिन्नस असलेला अनंदाचा शिधा 1 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली आहे.
प्रति शिधापत्रिका 1 संच ज्यामध्ये 1 किलो रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल असे एकूण 4 जिन्नस असलेला 1 संच रुपये 100 या दराने रास्तभाव दूकानातून वितरीत करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 3 लाख 62 हजार 42 प्राधान्य कुटुंब लाभार्थी व 26 हजार 865 अंत्योदन कुटुंब लाभार्थी अशा एकूण 3 लाख 88 हजार 907 पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेखी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी केले आहे.
No comments