हर घर तिरंगा अभियान : राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी पाठविण्याचे आवाहन
सातारा दि. १३ (जि.मा.का.) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त संपूर्ण देशभर मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हर घर तिरंगा अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकवून या अभियानात सहभाग घेतला.
तिरंग्यासोबतचा सेल्फी पाठवण्याचे आवाहन
हर घर तिरंगा अभियानामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रीय सहभागी होत असताना तिरंगा राष्ट्रध्वजासोबतचे छायाचित्र harghartiranga.com या लिंक वर अपलोड करावे, असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.
भारतीय ध्वज संहितेच्या अधिन राहून राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकवायचा आहे. तसेच राष्ट्रध्वज फडकवताना राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
No comments