फलटण येथे जिल्हास्तरीय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धा संपन्न ; ८० संघांचा सहभाग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ऑगस्ट 2023 ते 10 ऑगस्ट 2023 यादरम्यान जिल्हास्तरीय सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल , फलटण व मुधोजी महाविद्यालय फलटण या मैदानावरती आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटातील संघ सहभागी झाले होते. एकुण 80 संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन ताराळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपक चव्हाण यांनी सर्व संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
17 वर्षाखालील मुलांचा सामना मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम. यांच्या शुभहस्ते लावण्यात आला.17 वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना उपप्राचार्य श्री ननवरे ए .वाय.यांच्या शुभहस्ते लावण्यात आला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री शिवाजी पाटील, आर.सी.एफ चे माजी जनरल मॅनेजर श्री पवार , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री गंगवणे बी.एम, उपप्राचार्य श्रीननवरे ए .वाय., प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी सुमित पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री शिवाजी पाटील साहेब यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की जर तुम्ही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन उत्तम कामगिरी केल्यास शासनाच्या विविध खात्यामध्ये खेळाडू म्हणून, आपणास नोकरीच्या अनेक सुवर्णसंधी मिळतात, तसेच खेळाडूंनी दररोज सराव केल्यानंतर आपल्याला यश प्राप्त होते. हे यश प्राप्त करण्यासाठी ध्येया बरोबर कोठोर परिश्रम घेतल्यास निश्चीत यश प्राप्त होतेच असे यावेळी सांगितले. तसेच मा . प्राचार्य श्री गंगवणे बी.एम यांनी यावेळी खेळाडूंना प्रोत्सानात्मक मार्गदर्शन केले. खेळाडूंनी सराव करताना फिजिकल फिटनेस कडे जास्त भर द्यावा तसेच खेळाडूंचा सरावा बरोबर आहार देखील किती महत्त्वाचा आहे हे यावेली सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा समितीचे सचिव श्री सचिन धुमाळ यांनी केले यावेळी ते म्हणले की श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा संकुल मध्ये अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील खो-खो व इतर खेळाचे सामने यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडले गेले आहेत, त्यांच्या पाठिंब्यामुळे आशा स्पर्धा आयोजित करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत हे सांगितले. तसेच आज बक्षीस समारंभासाठी सर्व मान्यवर हे देखील कोणत्या ना कोणत्या खेळाशी संबंधित असलेले आहेत हे आवर्जून उल्लेख केला. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने देखील या स्पर्धा घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार देखील मानले.
वयोगट - १४ वर्षाखालील मुले
1) आप्पासाहेब भाऊराव पाटील, सातारा प्रथम
2)श्रीमंत शिवाजीराजे इ.मि. स्कूल (CBS.E.) द्वितीय
3)बिलीमोरीया स्कूल पाचगणी. तृतीय
4)मुधोजी हाय. वज्युनि. कॉलेज फलटण चतुर्थ
वयोगट १७ वर्षांखालील मुले
1)न्यू इंग्लिश स्कूल सातारा. प्रथम
2)सेंट पॉल स्कूल सातारा द्वितीय
3)बिलीमोरीया स्कूल पाचगणी तृतीय
4)यशवंतराव चव्हाण हायस्कूल सातारा चतुर्थ
वयोगट १७ वर्षाखालील मुली
1) युनीवर्सल नॉलेज स्कूल सातारा, प्रथम
2)माऊली एज्यूकेअर स्कूल रहिमतपूर द्वितीय
3)के. एस.डी. शानबाग स्कूल सातारा तृतीय
4)पोदार इंटरनेशनल स्कूल सातारा चतुर्थ
या स्पर्धेसाठी सातारा व फलटण मधील तज्ञ फुटबॉल पंचांनी काम पाहिलं.स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख श्री सचिन धुमाळ, मुधोजी महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री स्वप्निल पाटील, श्री तायप्पा शेडगे तसेच ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू श्री संजय फडतरे , फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक श्री अमित काळे, श्री कुमार पवार , मोनिल शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री कुमार पवार सर यांनी केले.
No comments