श्रीमंत संजीवराजे यांच्या उपस्थितीत जाधववाडी नळ पाणी पुरवठा योजना बैठक संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जाधववाडी नळ पाणी पुरवठा योजना ता.फलटण संदर्भात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (माजी अध्यक्ष जि. प. सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जाधववाडी सरपंच श्रीमती सीमा गायकवाड, उपसरपंच दिपकराव सपकळ, कोळकी ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य/ पदाधिकारी, जाधववाडी ग्रामपंचायत, तांत्रिक सल्लागार व ठेकेदार उपस्थित होते.
सदर बैठकीच्या जाधववाडी नळ पाणी पुरवठा योजनेतील पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली. १) बिरदेव नगर ESR (क्षमता 3.11 LL)- दि. 10/08/2023 रोजी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते भूमीपूजन झालेल्या जागेतच सदर टाकीचे काम तातडीने चालू करण्यात यावे असे ठरले.
२) शुद्ध पाणी उद्धरण नलिका - महादेव माळ ते कोळकी ग्रामपंचायत यांचे हद्दीतील पाईपलाईन साठी कोळकी व जाधववाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लाईनआऊट घेऊन काम करण्यात यावे आशा सूचना श्रीमंत संजीवराजे यांनी दिल्या.
३) साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र- यासाठी नवीन जलसंपदा संशोधन विभागाकडील जागेसंदर्भात श्रीमती.सु. मा. कदम ( उपविभागीय अभियंता.जलसंपदा संशोधन उपविभाग फलटण) यांच्यासोबत संजीवराजे यांची फोनद्वारे चर्चा झाली. त्यानुषंगाने त्यांचे वरिष्ठांशी देखिल मी समक्ष चर्चा करतो व शक्यतो वरीष्ठ पातळीवरूनच हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे संजीवराजे यांनी सांगितले.
No comments