मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद ; ३ लाख १२ हजार रुपये किंमतीचे ५ मोटार सायकली हस्तगत
Motorcycle stealing gang arrested; 5 motorbikes valued at Rs 3 lakh 12 thousand seized
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ - फलटण शहरामध्ये मोटार सायकल चोरी करणारी सक्रिय टोळी फलटण शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन जेरबंद करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३,१२,०००/- रुपये किंमतीच्या ५ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.
फलटण शहर पोलीस ठाणे गु. रजि. नं. २७० / २०२३ भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक सो, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री एस. व्ही. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक यांना गुन्हे तपास कामी सुचना देवून मोटार सायकल चोरी संदर्भाने खास विशेष पथकाची नियुक्ती केली. त्याप्रमाणे गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने माहीती मिळवून आरोपी यश संदीप ढालपे रा. बुधवार पेठ, फलटण ता, फलटण जि सातारा व निखील मोरे रा. जाधववाडी, फलटण ता फलटण यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता, ते सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होते, परंतु तपास पथकाने त्यांच्या कडे कसोशिने, चिकाटीने, कौशल्यपूर्ण तपास करुन नमुद गुन्हयातील आरोपी यांचे कडुन फलटण शहर पोलीस ठाणे कडील गु. रजि.नं १ ) २६८ / २०२३ भा.द..िव.स.कलम ३७९ २) २७० / २०२३ भा.द..िव.स. कलम ३७९३) ३८१ / २०२३ भा.द..िव.स. कलम ३७९४) ४२९ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३७९ ५) ५४९ / २०२३ भा.द..िव.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी यांचे कडुन ३,१२,०००/- रुपये किंमतीचे ५ मोटार सायकली जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सोो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सोर, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिक्षक सो, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली शिंदे, पोहवा २०५० धायगुडे, पोहवा ११८३ थापते, पोहवा. २११ वाडकर, पोहवा ५७९ शेंडगे, पोहवा. ६६ काळुखे, पोना ५९४ जगताप, म.पो.ना. ७३४ पवार, पोना ४७४ बनकर, पो.कॉ. १९९८ नाळे पो. कॉ. २४६६ जगदाळे, पो.कॉ. २५०१ अवघडे, पो.कॉ. १९५१ पाटोळे, पो.कॉ. २७०१ कर्णे, पो.कॉ. २५३० गायकवाड, पो.कॉ. २५१५ खराडे, पोकॉपो.कॉ. १५१४ टिके यांनी सदरची कारवाई केली आहे.
No comments