Breaking News

फलटण शहरात ५ ठिकाणी नो पार्किंग झोन ; नियम मोडल्यास कारवाई

No parking zone in 5 places in Phaltan city; Action for Violation of Rules

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ ऑगस्ट -  शहरात वाहतुक कोंडी होऊ नये याकरीता, फलटण नगर परिषद व फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त नियोजनाने,  शहरात ५ ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करेल त्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

    फलटण शहरातील नागरीकांना सुचित करणेत येते की, फलटण शहर पोलिस स्टेशन व फलटण नगरपरिषद यांचे संयुक्त नियोजनाने शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, शहरामध्ये नगरपरिषदे लगतचे मुधोजी वाहनतळ व डेक्कन चौक येथील वाहन तळ या दोन ठिकाणी विनामुल्य वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी नागरीकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाहने पार्कींग करावीत. तसेच शहरात वाहतुक कोंडी होऊ नये याकरीता १) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक २) डि एड कॉलेज चौक ३) गजानन चौक ४) डेक्कन चौक ५) छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात येत आहे. तरी दिनांक ०१/०९/२०२३ पासुन उपरोक्त नो पार्कींग घोषित केलेल्या ठिकाणी, वाहने पार्कींग करु नयेत, वाहने पार्कींग केलेली आढळलेस मोटार वाहन अधिनियम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी लोकांना धोका , अडथळा किंवा गैरसोय होईल अशा प्रकारे गाडी उभी करणे, या गुन्हयासाठी सेक्शन १२२ व १७७  एमव्हिए  या अंतर्गत प्रथम वेळी रक्कम रु.५००/- व व्दितीय वेळी रक्कम रु.१५००/- इतका दंड आकारणेत येणार असल्याचे फलटण नगर परिषदेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

No comments