Breaking News

फलटण तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक मुधोजी हायस्कूल येथे संपन्न

जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांचे स्वागत करताना प्राचार्य गंगावणे शेजारी मान्यवर.
Phaltan Taluka School Sports Competition Planning Meeting held at Mudhoji High School

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक व ठिकाण निश्चित करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या चित्रकला दालनात आयोजित क्रीडा स्पर्धा नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली.

    या बैठकीत शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व ऑनलाइन प्रवेशिका बाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी शालेय क्रीडा स्पर्धे दरम्यान मैदानासाठी उपलब्ध असलेल्या जागा व  स्पर्धेदम्यान येणाऱ्या अडी - अडचणी, क्रीडा शिक्षकांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्याविषयी  सविस्तर चर्चा करण्यात आली. 

    बैठकीनंतर स्पर्धेच्या ठिकाणांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मैदानी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धा या मुधोजी महाविद्यालय फलटण येथे, कबड्डी स्पर्धा श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व  ज्युनिअर कॉलेज मलठण येथे, खो - खो स्पर्धा मा आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे, व्हॉलीबॉल स्पर्धा श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी येथे, फुटबॉल व कराटे स्पर्धा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी. बी. एस. ई.) जाधववाडी फलटण येथे, कुस्ती स्पर्धा शौर्य सैनिक स्कूल गोळेवाडी, फलटण येथे व योगा स्पर्धा या फलटण तालुका क्रीडा संकुल जाधववाडी फलटण येथे होतील अशी घोषणा करण्यात आली.

    यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, फलटण तालुका प्रभारी  क्रीडा अधिकारी पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, पर्यवेक्षक व्ही. जे.  शिंदे, विनोद कुडवे, फलटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ सोनवलकर, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, सचिव अजय कदम, सहसचिव पंकज पवार, जिल्हा समन्वयक समिती सदस्य तुषार मोहिते, खजिनदार संदीप ढेंबरे, संघटक सचिन धुमाळ, अमोल नाळे, मुकुंद गायकवाड, जनार्दन पवार, तायप्पा शेंडगे यांनी उपस्थिती होती. 

    या बैठकीस फलटण तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा विभाग प्रमुख, क्रीडा स्पर्धांचे काम पाहणारे सहशिक्षक उपस्थित होते.

No comments