Breaking News

फलटण नगर पालिकेकडून डुक्करे पकडण्याची मोहीम

Pig catching campaign by Phaltan Municipal Corporation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण नगर पालिकेच्या वतीने,  आज डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली, शहरातील विविध भागात मोहीम राबवून तीन गाड्या भरतील इतके डुक्कर पकडण्यात आले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. तसेच ही मोहीम  वेळोवेळी चालू ठेवण्यात येईल, याचीं वराह पालन करणाऱ्या मालकांनी नोंद घ्यावी व शहरात डुकरे मोकाट फिरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

    फलटण शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून नागरिकांना डुकरांचा त्रास असल्याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी येत होत्या. त्याचप्रमाणे यासंदर्भात वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन बातम्या आलेल्या होत्या. यापूर्वी नगरपालिकेने सुद्धा वराह पालन करणाऱ्या मालकांना नोटीसा देऊन डुकरांना शहरांमध्ये मोकाट सोडण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याबाबत लेखी सूचना दिलेल्या तथापी यामध्ये फरक झालेला नसल्यामुळे,  नगरपालिकेने पुन्हा एकदा शेवटची संधी देऊन, वर्तमानपत्रामध्ये जाहीर सूचना दिलेली होती.असे असताना सुद्धा डुकरांचा त्रास कमी झालेला नव्हता, त्यामुळे आज रोजी नगरपालिकेने डुक्कर पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली.  नगरपालिकेने यासाठी कर्नाटकातून तीन गाड्या व ३० डुक्कर पकडणारे कर्मचारी तसेच नगरपालिकेचे ५० कर्मचारी, पोलीस स्टेशनचे ४ कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

    फलटण शहरातील इरिगेशन कॉलनी, विद्यानगर, दत्तनगर, पोलीस स्टेशनची मागील बाजू त्याचबरोबर सोमवार पेठ आणि जिंती नाका नदीचा परिसर यामध्ये डुक्कर पकडण्यासाठी मोहीम पार पडली. तीन गाडी भरतील इतके  डुकरे पकडण्यात आली असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

No comments