जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केले जेरबंद ; ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - फलटण शहरामध्ये जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून, जेरबंद करण्यात आले असून, त्याच्याकडून ; ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाणे गु. रजि. नं. ५५७ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३९२, ३४१ प्रमाणे दिनांक १७/०७/२०२३ रोजी दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी हे त्यांच्याकडील मोटार सायकल वरून काळुबाई नगर मटण येथे जात असताना, आरोपीने फिर्यादीची मोटार सायकल अडवुन थांबविले व मला मलटण मध्ये सोड, असे म्हणाले नंतर व फिर्यादीने नकार दिलेनंतर आरोपीने फिर्यादीच्या पाठीमागुन शर्टची कॉलर ओढली, त्यावेळी फिर्यादी मोटार सायकल सह खाली पडला, त्यानंतर आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण करुन, फिर्यादीच्या मोटार सायकल सह खाली पडला, त्यानंतर आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण करुन, फिर्यादीच्या सॅक मधिल कॅशबॅग मधुन ३०,०००/- रुपये जबरीने काढून घेतली व खाली पडलेला मोबाईल घेतला. व फिर्यादीची मोटार सायकल जबरी घेवुन तो निघुन गेला म्हणुन वगैरे मजकुरचे खबरी वरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हयाचे तपासी अधिकारी श्री एस. व्ही. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक यांना गुन्हे तपास कामी सुचना देवून खास विशेष पथकाची नियुक्ती केली. गुन्हयाचा तपास करत असताना पोलीस स्टाफ चे मदतीने घटनास्थळ रोड तसेच इतर संशयीत ठिकाणी आरोपी वर्णन, मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने आरोपी यांचा शोध घेतला असता पोलीस ठाणे अभिलेखावरील तुषार ऊर्फ गद्या संजय वय २१ वर्षे रा. झिरपेगल्ली मंगळवारपेठ फलटण ता. फलटण जि.सातारा यांने सदरचा गुन्हा केल्याचे निश्पन्न झाले, सदर आरोपी यांचा शोध घेवून त्याच्याकडे तपास केला असता, तो सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता, परंतु तपास पथकाने त्याच्याकडे कसोशिने, चिकाटीने, कौशल्यपूर्ण तपास करुन, सदरचा गुन्हा उघडकीस आणुन, सदर गुन्हयातील आरोपी यांस अटक करुन, गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल पैकी ९०५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपी यांचे कडुन जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपी यांची सद्या पोलीस अभिरक्षा मंजुर असुन गुन्हयाचा तपास पो.उप.निरीक्षक श्री. सुरज शिंदे हे करत आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक सोर, सातारा, श्री राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिक्षक सो, फलटण भाग फलटण, श्री. सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सुरज शिंदे, पोहया २०५० धायगुडे, पो.हवा ११८३ धापते, पो.हवा. २११ वाडकर, पो.हवा ६६ काळुखे, पो.ना. ५९४ जगताप, पो. कॉ. १९९८ नाळे पो.कॉ.२४६६ जगदाळे, पोर्को २५०१ अवघडे, पो.कॉ.१९५१ पाटोळे, पो.कॉ. २७०१ कर्णे, पो.कॉ.२५१५ खराडे, पो.कॉ.१५१४ टिके यांनी सदरची कारवाई केली आहे.
No comments