मणिपूर हिंसाचार, सोनवडी बलात्कार व कुरवली अत्याचार प्रकरणी वंचित आघाडी व शिवसेनेकडून निषेध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मणिपूर या ठिकाणी महिलेवर झालेल्या अत्याचारबद्दल निषेध, फलटण तालुक्यातील सोनवडी बलात्कार प्रकरण, कुरवली अत्याचार प्रकरण तसेच शालेय मुलींची होणारी छेडछाड, महिलांच्या तक्रारीवरती तातडीने कडक कार्यवाही व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (श्री.उद्धव ठाकरे पक्ष) महिला आघाडी व युवासेना यांच्यावतीने आंदोलन करून कारवाई करण्याबाबतची निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला शहर अध्यक्ष सौ. सपनाताई भोसले, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष)जिल्हा संघटक सौ. कल्पनाताई गिड्डे, फलटण शहर संघटक श्रीमती लताताई तावरे, वंचित आघाडी शहर अध्यक्ष उमेश कांबळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुभाष गायकवाड, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख विश्वास चव्हाण, ग्रंथालय सरचिटणीस श्री. आत्माराम सस्ते,युवासेना उपजिल्हा प्रमुख ऋषिकेश शिंदे, युवासेना शहर प्रमुख अक्षय तावरे, सामाजिक कार्यकर्त्या कांताबाई काकडे, सौ.चित्रताई गायकवाड, वंदनाताई गायकवाड, सौ.शोभा अहिवळे,सौ.मंदा अहिवळे, राजाभाऊ घोडपडे,शरद घोरपडे, सुखदेव शिंदे, बी.डी घोरपडे, विकास मोरे,चंद्रकांत गायकवाड, दिनकर जगताप, सूर्यकांत कांबळे, विजय कांबळे, आयाज आतार, रणजित मोहिते, गौतम मोहिते, विश्वास मोरे ,दत्तात्रय भगत,संदीप गायकवाड, महादेव गायकवाड तसेच मोर्चास समर्थन देण्यासाठी आजाद सेना पक्षाचे श्री.मंगेश आवळे, सामाजिक कार्यकर्ते श्री.सनी काकडे व हरीश काकडे उपस्थित होते.
No comments