सरपंच बापूराव गावडे यांनी खटकेवस्ती येथे भरवला जनता दरबार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे खटकेवस्ती गावचे विकासरत्न सरपंच बापूराव गावडे यांनी खटकेवस्ती गावातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी खटकेवस्ती गावामध्ये जनता दरबाराचे आयोजन केले होते. फलटण तालुक्यात गावपातळीवर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
खटके वस्ती येथे भरवण्यात आलेल्या जनता दरबार दरबारामध्ये, १) संजय गांधी निराधार योजना २) रेशन कार्ड काढून देणे ३)आधार कार्ड दुरुस्ती करणे ४) घरकुल योजना ५) जागे संदर्भातील अडचणी सोडवणे ६) शौचालय बांधणे ७) मतदान यादी मध्ये नाव लावणे ८) आरोग्य संदर्भात अडचणी दूर करणे ९) शासकीय योजनांची माहिती या विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली तसेच गावातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
या जनता दरबारासाठी खटकेवस्ती गावातील ५०० ते ६०० लोकांनी सहभाग घेऊन योजनेची माहिती घेतली. यावेळी खटकेवस्ती गावचे विकासरत्न सरपंच बापूराव गावडे यांचे खटकेवस्ती ग्रामस्थांनी मनापासून आभार मानले. यावेळी सरपंच बापूराव गावडे यांनी जनतेशी संवाद साधताना, १० ऑगस्ट पासून सरपंच आपल्या दारी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.
No comments