Breaking News

जागतिक मौखिक आरोग्य सप्ताहानिमित्त स्वच्छ मुख अभियान

Swachh Mukh Abhiyan on the occasion of World Oral Health Week

    सातारा - जागतिक मौखिक सप्ताहानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा यांच्याकडून स्वच्छ मुख अभियान जनजागृतीसाठी सातारा शहरातील एकूण चार प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच दातांची निगा कशी राखावी याबद्दल प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व दातांविषयी माहिती देण्यात आली.

    यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, साताराचे अधिष्ठाता डॉ.रविंद्रनाथ चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. डॉ.साक्षी राणे, डॉ.श्रद्वा कदम, डॉ. प्रियांका बाबर यांनी शाळेतील व महाविद्यालयातील मुलांना मौखिक आरोग्य कसे राखावे याबद्दल माहिती दिली.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे, उपअधिष्ठाता, डॉ.संगिता गवळी, डॉ. योगेश गवळी, डॉ.प्रितीश राऊत, डॉ विकास क्षीरसागर, युनियन पब्लिक हेल्थ मिशन स्कूल,साताराचे  मुख्याध्यापिका घाटगे, सेंट पॉल स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे मुख्याध्यापक नितीराज डेव्हिड पिल्लाई व निरिक्षण गृह/ बालगृह अधिक्षिका संजिवणी राठोड उपस्थित होते.

No comments