Breaking News

फलटण तालुका वारकरी संघटनेच्या वतीने शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

On behalf of Phaltan Taluka Warkari Association, felicitating the students who obtained merit in the examination of Navodaya Vidyalaya and scholarship

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)- सकल संत सांप्रदायिक अध्यात्मिक सामाजिक विकास सेवा संस्था तथा फलटण तालुका वारकरी संघटना यांच्यावतीने अध्यात्मिक व सामाजिक विकास सेवा करण्याच्या उद्देशाने समाजातील विशेष व्यक्तींचा सन्मान केला जातो. यामध्ये सन २०२२-२०२३ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणारे चि. अभिनव सतीश जंगम आणि चि. अमन रियाज मणेर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फलटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप छगन महाराज निंबाळकर, फलटण तालुका कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. नरसिंह निकम, हभप केशव महाराज जाधव, हभप दिलीप महाराज झगडे, भाजपा फलटण तालुका अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोकराव जाधव, डी. एम. घनवट, हभप शिवाजीराव घाडगे महाराज, किशोर गोडसे, युवा वारकरी संघटनेचे अध्यक्ष पवन महाराज, हभप विजय महाराज जाधव, प्रा. सतीश जंगम, प्रा. रवींद्र कोकरे, मोहनराव रणवरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना अ‍ॅड. नरसिंह  निकम यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करून या विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने अभ्यास करत पुढील स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे यांच्याकडूनही समाजाची सेवा, आणि अध्यात्मिक कार्य घडो अशी अपेक्षा व्यक्त केली.

    हभप केशव महाराज जाधव यांनी प्रास्ताविकात वारकरी संघटनेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली, तर प्रा. सतीश जंगम यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची माहिती दिली.

    सभेस हभप सुनील महाराज, गोपीचंद जाधव, नानासो शिंदे, हभप गोविंद महाराज कळंबे, आनंद महाराज कळंबे, हरिभाऊ महाराज कळंबे, विठ्ठल महाराज कळंबे,रमेश सोनवणे,   अशोक शिर्के, संपतराव सूर्यवंशी, सोनबा ईवरे, दिगंबर कणसे यांच्यासह वारकरी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

No comments