Breaking News

फलटण शहरातील राजस्थानी व्यवसायिकांना कामगार संघटनेचा इशारा ; राजस्थान येथे आदिवासी महिलेच्या हत्या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणी

Trade union warning to Rajasthani businessmen in Phaltan city; Demand for execution of accused in case of murder of tribal woman in Rajasthan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - तारपाल भिलबस्ती सरमोला जिल्हा उदयपूर, राजस्थान येथील आदिवासी महिलेची हत्या करणाऱ्या राजपूत सामाज्याच्या आरोपीला फाशी देण्याची मागणी करत फलटण शहरातील राजपूत व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद करून फलटण शहर सोडले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघर्ष  संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

    उपविभागीय अधिकारी फलटण यांना कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन उपरोक्त मागणी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष सनी काकडे,  महादेव गायकवाड, मंगेश आवळे, अमर झेंडे, सुरज भैलुमे उपस्थित होते.

    उपविभागीय अधिकारी फलटण यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तारपाल भिल बस्ती सरमोला जिल्हा उदयपूर येथील आदिवासी महिलेची हत्या करणाऱ्या राजपूत सामाज्याच्या आरोपीला त्वरित फाशी देण्यात यावी, कारण या भारत देशा मध्ये लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कोणीच सुरक्षित नाहीत, त्याच बरोबर खैरलांजी, निर्भाया, मणिपूर या सारख्या घटना घडत आहेत. त्या मुळे ज्या राजपूत समज्याच्या व्यक्तीने, आमच्या आदिवासी महिलेला तडपून तडपून जीवे मारले, त्याचा कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने निषेध तर करतोच पण पुन्हा महिलांवर अन्याय करायला धाडस होणार नाही असा निषेध करण्यात येणार आहे तरी या पत्र द्वोरे आपणास कळवत आहे की, फलटण शहरात जेवढे राजपूत सामाज्याचे व्यावसायिक आहेत त्यांची हलक पाटी करण्यात येणार आहे. येणाऱ्या ५ दिवसात जर या फलटण शहरातील राजपुतांचे व्यवसाय बंद झाले नाहीत, तरी आम्ही त्यांना व्यवसाय करू देणार नाही, तसेच फलटण शहरतील स्थानिक व्यावसाय करणाऱ्या लोकांनाही त्यांचा मोठा त्रास होत आहे. हे बाहेरील व्यावसायिक फलटण शहरातून गेली पाहिजेत नाहीतर आजून काही दिवसांनी या फलटण शहरामध्ये सुद्धा असेच प्रकार घडतील याची आपण दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामास शासन जबाब दार राहील.

No comments