१ तारीख १ तास श्रमदान' नागरिकांनी सहभागी व्हावे - मुख्याधिकारी संजय गायकवाड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० : '१ तारीख १ तास श्रमदान' या फलटण नगरपरिषद फलटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन, आपला एक तास या अभियानात द्यावा असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
महात्मा गांधी जयंती निमित्ताने दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता 'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत १ तारीख १ तास श्रमदान' हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. फलटण शहरात देखील फलटण नगर परिषदेच्या वतीने एक तारीख एक तास हे अभियान दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता शहरातील विविध भागात राबविण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक १ पेठ सोमवार फिरंगाई मंदिर परिसर प्रभाग, प्रभाग क्रमांक २ टेंगुळ चौक कुरेशी नगर मस्जिद परिसर, प्रभाग क्रमांक ३ पाचबत्ती चौक परिसर, प्रभाग क्रमांक ४ डॉक्टर साळुंखे परिसर, प्रभाग क्रमांक ५ उंबरेश्वर चौक परिसर, प्रभाग ६ शंकर मार्केट परिसर, प्रभाग क्रमांक ७ आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक परिसर, प्रभाग क्रमांक ८ फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ७ परिसर, प्रभाग क्रमांक ९ गजानन चौक परिसर, प्रभाग क्रमांक १० श्रीकृष्ण मंदिर परिसर, प्रभाग क्रमांक ११ हॉटेल रायगड तसेच नवीन कोर्ट परिसर, प्रभाग क्रमांक १२ बोहरी मस्जिद परिसर, या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, तरी सर्व नागरिकांनी स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत १ तारीख १ तास श्रमदान या अभियानात, उपरोक्त दिलेल्या आपल्या जवळील ठिकाणी सहभागी व्हावे.
No comments