कत्तलीसाठी चालवलेली १३ जनावरे पकडली ; १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - मौजे सरडे ता. फलटण गावची हद्दीत, १३ जर्शी गायी आयशर ट्रक मध्ये दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आल्या प्रकरणी अनोळखी चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण १२ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ सप्टेंबर रोजी ००.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे सरडे ता. फलटण गावची हद्दीत आयशर ट्रक क्रमांक एम.एच.१२ सी.टी. ०६९० चा अनोळखी चालक याने, सदर वाहनांमध्ये एकूण ४ लाख ३४ हजार रुपये किंमतीच्या १३ जर्सी गायी दाटीवाटीने भरून, त्यांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी ८ लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक व १३ गायी असा एकूण १२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनोळखी चालकाचे विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एपीआय रानगट हे करीत आहेत.
No comments