फलटण तालुक्यातील १४ जणांना केले तडीपार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ सप्टेंबर - गणेशोत्सव काळात फलटण तालुक्यातील १४ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करत, त्यांना २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
गणेशोत्सव काळात २० लोकांचे तडीपारचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांना पाठवण्यात आलेले होते. त्यापैकी १४ जणांचे गणेश विसर्जनाच्या अगोदर तीन दिवसापासून, दि.२७ ते ३० तारखेपर्यंत तडीपारीचे आदेश पारित झालेले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी प्रस्ताव पाठवून केली आहे. तसेच आणखी एक-दोन दिवसात सहा लोकांचे तडीपारी आदेश निघणार असून, इतरही लोकांचे हद्दपारचे प्रस्ताव पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
१) आनंदराव सोपान खटके रा. खटकेवरती ता फलटण
२) अक्षय बापुराव ऊर्फ अजित खटके रा. खटकेवरती ता फलटण
३) संग्राम बापुराव ऊर्फ अजित खटके रा. खटकेवरती ता फलटण
४) बापुराव ऊर्फ अजित सोपान खटके रा. खटकेवरती ता फलटण
५) सागर आनंदाराव खटके रा. खटकेवरती ता फलटण
६) प्रणय गोरख शिंदे रा. ताथवडा ता फलटण
७) नरेंद्र रघुनाथ शिंदे रा. ताथवडा ता फलटण
८) केशव दौलत शिंदे रा. ताथवडा ता फलटण
९) ओम नरेंद्र शिंदे रा. ताथवडा ता फलटण
१०) बापुराव पांडुरंग कांबळे रा. गुणवरे ता फलटण
११) विशाल बापु घाडगे रा. निभोरे ता फलटण
१२) भानुदास बापु रणवरे रा. जिती ता फलटण
१३) सुनिल कुंडलिक चांगण रा. दुधेबावी ता फलटण
१४) विजय बापू कांबळे रा. निभोरे ता फलटण
No comments