Breaking News

खून करून हातपाय बांधून कॅनॉलमध्ये फेकल्या प्रकरणातील आरोपी ताब्यात ; फलटण पोलिसांकडून ६ तासात गुन्हा उघड ; पत्नीनेच केला घात

आरोपींसमवेत अप्पर पोलीस अधिक्षक, राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक सुनिल शेळके व पोलिस कर्मचारी
Accused arrested in case of murder and throwing in canal; Phaltan police revealed the crime in 6 hours 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ सप्टेंबर -  प्रियसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्याच्या साथीदारासह, प्रियसीच्या पतीचा गळा आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे हातपाय बांधून त्याला कॅनॉलमध्ये फेकून दिला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास ६ तासांमध्ये गुन्हा उघड करण्यात यश आले आहे. याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिली.

    फलटण मध्ये घडलेल्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर हे बोलत होते.  यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके उपस्थित होते.

    दिनांक १७/०९/२०२३ रोजी रात्री ०८.०० वजनाच्या सुमारास श्री सिध्दीनाथ गणेश तरुण मंडळ - शिवाजीनगर फलटण येथुन इसम नामे अजित पोपट बुरुंगले वय २४ वर्षे रा. नगरपरीषद शाळा क्रमांक ०७ चे पाठीमागे शिवाजीनगर, फलटण, जि. सातारा हा घरात कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेला आहे. तो अद्याप पर्यंत परत आला नाही. तरी माझ्या मिसींग मुलाचा शोध व्हावा म्हणून वगैर मजकुरची मिसिंग गुन्हा पोपट आप्पा बुरुंगले यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे दिली होती. त्याप्रमाणे मिसींग रजिस्टर नंबर ६६ / २०२३ प्रमाणे दिनांक १८/०९/२०२३ रोजी दाखल करण्यात आला होता.

    सदर मिसींग दाखल झाल्यानंतर सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक सो, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी मिसींग तपास महिला पपोलिस नाईक बोबडे यांच्याकडे देण्यात आलेला होता. मिसींग तपास करत असताना दिनांक - १९/०९/२०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विडणी ता. फलटण गावचे हद्दीमध्ये दाखल मिसीगचे वर्णनाचे एक अनोळखी बेवारस प्रेत मिळून आले. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे ४५१०/२०२३ भा.द.वि.स. कलम ३०२,२०१ प्रमाणे दिनांक १९/०९/२०२३ रोजी १४.१३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    वरील प्रमाणे फलटण शहर पोलीस ठाणे मिसींग रजि नंबर ६६ / २०२३ मधिल मिसिंगचे वर्णन व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे मधील मिळुन आले, अनोळखी बेवारस मयताचे वर्णन व कपडे यांच्या साधर्म्य असल्याने, सदर मिसींग तपास कामी, पोलीस ठाणे कडील पो.उप.नि शिंदे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची खास नियुक्ती करुन मिसींग व्यक्तीचा सी.डी. आर चे तांत्रीक विश्लेषण तसेच मिसिंग इसमाचे पत्नीकडे अत्यंत कसोशीने व कौशल्यपूर्ण तपास करुन, मिसींग तपासामध्ये मयत अजित पोपट बुरुंगले रा. शिवाजीनगर फलटण यांची पत्नी हिचे आरोपी नामे करण विठ्ठल भोसले रा. थेऊर रोड संस्कती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे यांचे प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधास व लग्न करणेसाठी तिचा पती हा अडथळा येत असल्याने आरोपीने त्याचा साथीदार राहुल उत्तम इंगोले वय २२ वर्षे रा. लोहमार्ग रोड बालाजी ट्रेडर्सचे समोर, वाघोली पुणे यांचे मदतीने यातील मिसीग व्यक्ती अजित बुरुगले यांस फलटण येथे घरातुन बाहेर फोन करून बोलावुन घेवुन त्यांचा साथीदार यांचे मदतीने मिसींग अजित बुरुगले यांचा दोरीने गळा आवळुन त्यानंतर त्यांचे हात पाय दोरीने बांधून पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने त्यास निरा उजवा कॅनॉल मध्ये टाकुन देवून त्याचा खून केला आहे, अशी कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले यांने दिली असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचे अधिक तपासामध्ये आरोपी करण विठ्ठल भोसले रा. थेऊर रोड संस्कृती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे २. शिवानी अजित पोपट बुरुंगले वय १९ वर्षे रा. शिवाजीनगर फलटण ता फलटण जि. सातारा यांस अटक करण्यात आली असून, सदर गुन्हयाचा अधिक तपास सुनिल शेळके पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करत आहेत.

    सदरची कामगीरी  समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, बापू बांगर अप्पर पोलीस अधिक्षक, सातारा, राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण भाग फलटण,  सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सुरज शिंदे, पोहवा. २११ वाडकर, पो.हवा. १९८३ धापते, पो.ना. ५९४ जगताप, पो.कॉ. १९५१ पाटोळे, पो.कॉ. २७०१ कर्णे, पो.कॉ. २५१५ खराडे, म.पो.ना. १६०९ बोबडे, म.पो.ना. १४८ वाघ, म.पो.ना. ७७३ फाळके, म.पो.कॉ. २०८३ करपे यांनी सदरची कारवाई केली आहे.

No comments