Breaking News

महिलेस चाकूने मारहाण ; दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Beating a woman with a knife; A case has been registered against two persons

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे सुरवडी ता. फलटण येथे एका महिलेस मारहाण करून, तिला चाकूने जखमी केल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० रोजी मौजे सुरवडी गावाच्या हद्दीत रात्री ९:३० वाजण्याच्या सुमाराला ग्रामपंचायतीचे पाण्याच्या टाकीवर फिर्यादी सखुबाई रमेश चव्हाण (रा. सुरवडी ता. फलटण) या पाणी भरण्यासाठी गेल्या असता, टाकीजवळ फिर्यादी यांची चुलत बहीण कविता पिंटू चव्हाण (रा. सुरवडी ता. फलटण) हिने तू आमचे कामगार रवी राठोड यास घरातून हाकलून का लावले असे म्हणून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व अक्षय पूर्ण नाव माहित नाही (रा.सुरवडी ता. फलटण) याने त्याच्या हातातील चाकू फिर्यादी यांच्या मनगटावर मारून जखमी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.हवा.पिसे करत आहेत.

No comments