केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वर्षा निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत
मुंबई, दि. २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.
No comments