पुस्तक दहीहंडी : छत्रपती शिवाजी वाचनालयास १३० पुस्तके भेट
Book Dahihandi: Gift of 130 books to Chhatrapati Shivaji Library
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - वंदे मातरम संघटना, पुणे व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दरवर्षी 'पुस्तक दहीहंडी' हा कार्यक्रम आयोजित केला जातो, यावर्षी शंकर मार्केट, फलटण येथील गणेश उर्फ गिल्लू देशपांडे यांच्या पुढाकाराने, श्री छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण यांना १३० पुस्तकांचा संच देण्यात आली.
वंदे मातरम संघटना, पुणे व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी "पुस्तक दहीहंडी" कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या अनुषंगाने यावर्षी पुस्तक दहीहंडी कार्यक्रमात, श्री छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण या संस्थेस १५० वर्षे पूर्ण झाली, याचे औचित्य साधून १३० नामांकित पुस्तकांचा संच देणगी स्वरूपात देण्यात आला. या देणगी बद्दल श्री छत्रपती शिवाजी वाचनालय यांनी दोन्ही संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी छत्रपती शिवाजी वाचनालयाचे सचिव श्रीकृष्ण देशपांडे, फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, युवा उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, हरिश्वर गजफोडे, ओंकार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments