दारू पिऊन बीएमडब्ल्यू (BMW) चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ सप्टेंबर - मद्य प्राशन करून बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या युवकावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २१/९ /२०२३ रोजी रात्रौ ०१.५० वाजण्याच्या सुमारास दहिवडी चौक, फलटण ता. फलटण येथे इसम नामे गिरीश चंद्रकांत काटकर वय २८ वर्ष राहणार सध्या राहणार ब्ल्यूरीच हिंजवडी फेज तालुका मुळशी जिल्हा पुणे मुळ राहणार दहिवडी तालुका मान, जिल्हा सातारा याने त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार नंबर एम एच १२ - १९९० ही मद्य प्राशन करून चालवीत असताना मिळून आल्याप्रकरणी काटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करीत आहेत.
No comments