चैन स्नॅचिंग : देव दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ सप्टेंबर - लक्ष्मीनगर फलटण येथून रस्त्याने चालत देवदर्शनासाठी जात असताना, मोटर सायकल वरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मंगळसूत्रातील २२ हजार ५०० रुपये किंमतीचा काही भाग चोरट्यानी लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१/९/२०२३ रोजी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास, सुरेखा शरदकुमार दोशी वय ६२ वर्षे रा.रामरक्षा आपार्टमेंट , लक्ष्मी नगर, फलटण ता. फलटण या मारवाड पेठ, फलटण येथील चंद्रपूर मंदिरात देवदर्शनासाठी चालत चालल्या होत्या. लक्ष्मीनगर येथील अपना बाजारच्या समोर आल्यावर, रोडवरून दोन अनोळखी इसम मोटरसायकल वरून दोशी यांच्या पाठीमागून पुढे गेले व परत वळून माघारी आले व त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने दोशी यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन मधील मंगळसूत्रामधील २२ हजार ५०० रुपये किंमतीचा अंदाजे ९ ग्रॅम वजनाचा काही भाग ओढून घेऊन गेले असल्याची फिर्याद सुरेखा शरदकुमार दोशी यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस गळवे करीत आहेत.
No comments