सध्या फलटण परिसरात दिसणारा वन्यप्राणी तरस : समज आणि गैरसमज
(गंधवार्ता वृत्तसेवा) - तरस जातीचा प्राणी सध्या फलटण शहरानजीक वारंवार दिसून येत आहे, मात्र काही लोक ह्या वन्यप्राण्याचे फोटो,वीडियो सोशल मीडियावर चुकिच्या पध्दतीने व्हायरल करत आहेत, पण या विषयाच्या मुळाशी जाऊन खरा विषय समजून घेतला तर असे समजून येते की, गेल्या ४-५ वर्षांमध्ये फलटण जवळील डोंगरावर वारंवार वणवे लावण्याचे प्रकार घडुन आले आहेत, ज्यामधे असंख्य वन्यजीव मृत होत आहेत आणि ह्यामुळे बऱ्याच वन्यजिवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. तसेच कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये मेलेले पक्षी, हॉटेल,चिकन दुकानातून उरलेले मांस,पाळीव व बेवारस मृत झालेले जनावरे यांचा व्यवस्तीत निचरा न केल्याने, त्याकडे आकर्षित होऊन हा प्राणी अन्न खाण्याच्या शोधात शहराकडे वळत आहे आणि ह्या घटनांचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. पण खरं पहायला गेल तर हा प्राणी खुप शांत स्वभावाचा असुन, मानवांवर हल्ले केलेल्या घटनांचे पुरावे फारसे आढळून येत नाहीत.
तरस हा प्राणी फार पुर्वी पासुन मनुष्यवस्तीच्या आसपास वावरणारा प्राणी म्हणुन ओळखला जातो, पण जसे पुर्वीचे लोक निसर्गाला आणि वन्यजिवांना जोडलेले होते, तसे आजची माणसं या सर्व बाबींपासुन अलिप्त आहेत. ज्यामुळे आज असे अज्ञान दिसून येत की, हा वन्यप्राणी आपल्यासाठी धोकादायक आहे. पण हे खरच सत्य आहे का,अश्या गोष्टींची योग्य शहानिशा न करता ह्या प्राण्याला दोष दिला जातो व मनुष्यांसाठी धोकादायक आहे, अश्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण खरतर तरस हा प्राणी निशाचर (रात्री आढळणारा) असुन निसर्गात सफाई कर्मचारी म्हणुन काम करतो ज्या मधे तो मेलेलं,कुजलेल आणि सडलेलं मांस खाऊन जगतो व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत करतो. यातुन माणसांना होणारे बरेचसे संसर्गजन्य आजारांवर आळा बसतो.
सध्या हा प्राणी जरी शहराकडे आला असला तरी, तो काही दिवसांनी पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघुन जाईल आणि त्यासाठी आपण पण संयमाने विषय हाताळला पाहिजे, पण चुकिच्या पध्दतीने हा प्राणी प्रसारमाध्यमातून आज बदनाम होत आहे, ही खुप दुर्दैवी घटना आहे आणि हा प्राणी मानवांवर कधीच हल्ला करत नाही, तरीपण अपुरी माहिती आणि अज्ञानापोटी आज लोक समाजापुढे अश्या वन्यजिवांना चुकीच्या पध्दतीने सादर करत आहेत. हा प्राणी आपल्या नजिकच्या परिसरात दिसल्यास घाबरुन न जाता, कोणत्याही प्रकारची गर्दी व आरडा-ओरडा न करता, त्याला तेथुन बाहेर जाण्यास मार्ग मोकळा करावा. तरी आम्ही नेचर अँड वाईल्ड लाईफ सोसायटी फलटण तर्फे सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करत आहोत की घाबरुन न जाता कोणत्याही अश्या अफवांवर आणि चुकिच्या माहिती वर विश्वास न ठेवता अश्या वन्यजीवांबद्दल योग्य माहिती हवी असल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करावा ही आपणा सर्वांना नम्र विनंती.
संपर्क - 9011572689, 9860850019, 9421571709
No comments