महावीर स्तंभाच्या रेलिंगला आयशर ट्रकची धडक ; दारूच्या नशेत अपघात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दारूच्या नशेत, भरधाव वेगात चाललेल्या आयशार ट्रकने रविवार पेठ, फलटण येथील महावीर स्तंभाच्या रेलिंगला धडक दिल्याने, महावीर स्तंभाचे रेलिंग उध्वस्त झाले आहे. याप्रकरणी मांडवखडक येथील युवकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१७/९/२०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फलटण येथील रविवार पेठेतील महावीर स्तंभाच्या रेलिंगला आयशर ट्रक क्रमांक एम एच ०५ ईएल ७८१५ ने जोरात धडक दिली. आयशर ट्रक चालक अक्षय राजेंद्र लोंढे वय २३ वर्षे रा. मांडवखडक ता. फलटण याने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात, रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन, अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणे दारुचे नशेत चालवुन महावीर स्तंभाचे कडेला बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोखंडी ग्रीलच्या कंम्पाऊंडला जोराची धडक देऊन, सदर स्तंभाचे सुमारे 3000 रुपयांचे नुकसान केले. घटनास्थळी लोक जमल्यानंतर, चालक लोंढे हा पळुन गेला असल्याची फिर्याद अनुप रमणलाल शहा यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोबडे या करीत आहेत.
No comments