शासन आपल्या दारी उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुले हासू
नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळावा व त्यांचे कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचावे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने शासन आपल्या दारी योजना सुरु केली. या योजनेचा शुभारंभ दौलत नगर ता. पाटण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 74 हजार 348 इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले. या योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी तालुकास्तरावरही विविध मिळावे घेऊन नागरिकांना लाभ देण्यात आला. सहज उपलब्ध झालेल्या लाभामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारे हासु फुलले आहे.
शासन आपल्या दारी योजनेमध्ये महसूल, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य विभाग, कृषि विभाग, नगर विकास विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा पाणी पुरवठा व स्चछ मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यासह विविध विभागांनी लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली.
नागरिकांना लाभ देण्यापूर्वी गावपातळीवर शासन आपल्या दारी अभियानाची माहिती देऊन गावातच नागरिकांकडून लाभासाठीचे अर्ज भरुन घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देवून त्याची पुर्तताही करण्यात आली. स्थानिकरित्या आयोजित मेळाव्याच्या ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध दालनाद्वारे लाभाचे वापट करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या पुढकाराबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करुन करुन अशा मेळाव्यामुळे वेळ आणि पैशची बचत होत असून असा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा, अशी प्रतिक्रया देवून शासनाला धन्यवादही दिले.
लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे काम - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
शासन आपल्या दारी उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमामध्ये विविध शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करुन 2 लाख 74 हजार 348 इतक्या लाभांचे वाटप करण्यात आले. यासाठी तालुकास्तरावरही मेळावे घेण्यात आले. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभाचे वाटप करण्यात आले. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमामुळे सहज विविध लाभ उपलब्ध करुन लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम झाले आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या प्रभावी अमंलबजावणी मुळे हे शक्य झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सांगून सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातारा तालुक्यात – 38 हजार 913, जावली तालुक्यात – 15 हजार 23, कोरेगाव तालुक्यात – 19 हजार 521, कराड तालुक्यात - 48 हजार 62, फलटण तालुक्यात - 32 हजार 748, वाई तालुक्यात – 18 हजार 608, महाबळेश्वर तालुक्यात – 7 हजार 718, खंडाळा तालुक्यात - 19 हजार 169, माण तालुक्यात – 18 हजार 760, खटाव तालुक्यात – 26 हजार 718, पाटण तालुक्यात – 29 हजार 108 एवढ्या लाभांचे वाटप करण्यात आले.
No comments