Breaking News

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनेमुळे महेश निकम यांना मिळाली आर्थिक सुबत्ता

Mahesh Nikam got financial support due to the scheme of Annasaheb Patil Economic Development Corporation

Gandhawarta SPECIAL  -  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनेमुळे महेश निकम यांना मिळाली आर्थिक सुबत्ता

    पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी महेश निकम यांना शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 6 लाखाचे कर्ज उपलब्ध झाले आहे. या मिळालेल्या कर्जामधून त्यांनी चांगल्या पद्धतीने गोठा व 2 गायी घेतल्या आहेत. त्यांना महिन्याकाठी 25 ते 30 हजारांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. त्यांची ही यशोगाथा.

    महेश निकम हे पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी. त्यांना बागायती साडेचार एकर शेती. संपूर्ण क्षेत्रात ऊस उत्पादन करीत आहेत. या उत्पादनातून त्यांना वर्षाला एकदा पैसे मिळत होते. मिळालेले पैस वर्षभर पूरत नसल्याने त्यांची आर्थिक चणचण भासत होती. त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनांची माहिती घेऊन गोठा बांधकामासाठी व गायी विकत घेण्यासाठी  कर्जाचा प्रस्ताव मल्हार पेठ येथील शिव दौलत बँकेकडे सादर केला.

    बँकेने कागदपत्रांची पडताळणी करुन श्री. निकम यांना 6 लाखचे कर्ज दिले. या कर्जावर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडून 12 टक्के व्याज परतावा दिला जात आहे. श्री. निकम यांनी 3 लाख रुपये खर्चून  सुसज्ज असा गोठा बांधून उर्वरित तीन लाखाच्या 2 गायी घेतल्या आहेत. गायी साधरणत: दररोज किमान 25 ते 30 लिटर दूध देत आहेत. हे दूध डेरीला घालत असल्याचे सांगून 15 दिवसाला या डेरीकडून दूधाचे पैसे पेड केले जात आहे. साधरणा खर्च वजा जाता  महिन्याला 25 ते 30 हजार रुपांचा निव्वळ नफा होत असल्याचेही श्री. निकम सांगताता.

    गोठ्याची साफसफाई व गायींची देखभ मी आणि माझी पत्नी करीत आहे. या महामंडळाच्या योजनेमुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली असून जीवनमानातही बदल झाला आहे. महामंडळाकडील योजनांमुळे अनेक मराठा समाजातील  तरुण उद्योजक तसेच छोटे मोठे व्यवसाय सुरु करु शकले आहेत. उपलब्ध नोकऱ्या पाहता मराठा समाजातील युवक-युवतींनी नोकरीच्या मागे न लागता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकील योजनेचा लाभ घेऊन आपला व्यावसाय सुरु करावा असेही श्री. निकम आर्वजुन सांगताता.

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे आत्तापर्यंत 9 हजार 715 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी 4 हजार 714 लाभार्थ्यांना 410 कोटींचे कर्ज बँकेमार्फत वितरण करण्यात आले असून यावर महामंडळाकडून 31 कोटी रुपयांचा व्याजपरतावा देण्यात आला आहे. उद्योग व छोटे व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील मराठा समाजाततील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डण पुला जवळ, सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सन्मवय मयुर घोरपडे यांनी केले.
  वर्षा पाटोळे
  जिल्हा माहिती अधिकारी,  सातारा

No comments