पंजाबच्या कृषिमंत्र्यांची के. बी. कंपनीस भेट ; केबी च्या मदतीने साकारणार सेंद्रिय शेतीतील हरितक्रांती व निर्यातवृद्धी - कृषिमंत्री गुरुदीपसिंग खुडिया
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीविषयक सखोल ज्ञान व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करत, उद्याच्या उज्वल भविष्याची मशाल हाती घेत, कर्करोगासारख्या अंधःकारावर मात करुन आपल्या मातीवर प्रेम करण्याचा संदेश देणारी आणि या मातीमधून सेंद्रिय शेतमाल पिकवण्यासाठी तसेच निर्यातक्षम व भरघोस उत्पादन मिळवण्याची जादूई संजीवनीरुपी वनस्पतीजन्य अर्कावर आधारित सेंद्रिय कीटकनाशके व खतांची निर्मिती करणारी भारतातील सर्वात पहिली व अग्रगण्य कंपनी म्हणजेच फलटण येथील के.बी. बायो ऑरगॅनिक्स.
१९६२ मध्ये भारत देशात हरित क्रांतीची मुहूर्तमेढ पंजाब येथे रोवण्यात आली. हरित क्रांतीमूळे सुरुवातीच्या काळात अन्नधान्याचे उत्पादन तर वाढले परंतु भरमसाठ रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर अतिशय घातक परिणाम तर होतच आहे, शिवाय जागतिकीकरणाच्या या लाटेमध्ये जेव्हा परदेशात सेंद्रिय शेतमालाचे आयातीस काटेकोर चाचण्यांमधून जावे लागत असल्याने निर्यातक्षम शेतमाल उत्पादनात जर रसायनांचे किंचितही अवशेष सापडले तर फार मोठा फटका बसत आहे. त्यामुळे केमिकल रेसिड्यू फ्री तांदूळ व गहू उत्पादन करणे ही सध्या पंजाब मधील खूप मोठी समस्या बनली आहे व याच समस्येवर खात्रीशीर उपाय मिळवण्यासाठी पंजाब राज्याचे कृषी मंत्री गुरदीप सिंग खुडियां तसेच जलालाबादचे विधायक जगदीप कंबोज गोल्डी, कृषी सहसंचालक डॉ. राज कुमार (Joint Director Agriculture, Plant Protection), डॉ. गुरुदेव सिंग (SMS), डॉ जसविंदर सिंग (APPO), सुरींदर सिंग व त्यांच्या चमूने शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक्स या कंपन्यांना भेट दिली आहे.
या भेटीदरम्यान सर्व युनिट्सची त्यांनी सखोल पाहणी केली असून तेथील प्रयोगशाळा व संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेले कामकाज पाहून अचंबित झाले आहेत व गौरवोद्गार काढत “कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये तुम्ही नव्या युगाचा प्रारंभ केला असून, रसायनांना वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा पर्याय मानवजातीसाठी उपलब्ध करुन देत, एक महत्वाची भूमिका तुम्ही निभावत आहात ..जी अतिशय उल्लेखनीय असून शेतकऱ्यांना तुम्ही अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जात आहात. कर्करोगाशी सामना करण्याची ताकद आणि परकीय चलन निर्माण करण्याची हिंमत तुम्ही शेतकर्यांना देत आहात “असे त्यांनी कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव यांच्याशी बोलताना सांगितले.
यावेळी के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीच्या अत्याधुनिक कडूनिंबापासून बनवण्यात येणाऱ्या अॅझाडिरिक्टिन या कीटकनाशकाच्या अत्याधुनिक प्लांटचे पंजाबचे कृषी मंत्री गुरदीप सिंग खुडियां यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच स्वतः कृषिमंत्री व त्यांच्या संपूर्ण टीम ने के. बी. कंपनी निर्मित उत्पादनांचा वापर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक शेताची पाहणी केली व पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, औषधांच्या परिणामांची पाहणी करून स्वतः खात्री शेतकऱ्यांसोबत ओषधांच्या परिणाम व निर्यात या विषयी चर्चा केली. यावेळी सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ भाग्यश्री फरांदे उपस्थित होत्या.
तीन दिवसीय अभ्यासपूर्ण पाहणीनंतर कृषिमंत्र्यांनी प्रतिपादन केले की, के. बी. कंपनीची औषधे वापरून पंजाब मधून केमिकल रेसिड्यू फ्री तांदूळ व शेतमाल निर्यात करणे शक्य होणार आहे व पंजाब मध्ये ऑरगॅनिक शेतीची मोठी क्रांती महाराष्ट्रातील केबी च्या मदतीने घडून येणार आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये निर्यातक्षम शेतमाल पिकवण्यासाठी पंजाब राज्याचा कृषी विभाग के. बी. कंपनीसोबत संपर्क ठेवत दुसर्या सेंद्रिय हरितक्रांतीची मुहूर्तमेढ पंजाब मधे रोवेल असा संकल्प व्यक्त केला.
No comments