खुंटे व बारामती येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पोक्सो व आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - खुंटे ता. फलटण व बारामती येथे अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने बलात्कार करून, सदरचा प्रकार घरातील लोकांना सांगीतला तर, तुझ्या वडीलांना जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिल्याप्रकरणी खुंटे ता. फलटण येथील गौरव उर्फ सचिन नितीन खलाटे यांच्या विरोधात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पाच महिण्यापुर्वी खुंटे ता. फलटण येथील रीटे वस्तीवर जनावरांचा गोट्यावर सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी एकटी असताना, गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे रा. खुंटे ता. फलटण हा दुचाकी वाहनावरून तेथे आला. व पीडित मुलीशी वेगवेगळे अश्लील चाळे करुन, त्याने पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. तसेच पीडित मुलगी बारामती येथे शिक्षण घेत असताना, पीडित मुलीस ब्लॅकमेल करुन, त्याच्या पांढरे रंगाची ओमणी गाडीत बळजबरीने बसवुन निर्जन स्थळी नेऊन, दोन ते तीन वेळा बळजबरीने बलात्कार केला आहे. तसेच सदरचा प्रकार घरातील लोकांना सांगीतला तर तुझ्या वडीलांना जिवे मारुन टाकीण अशी दमदाटी केली. सुमारे एक महिण्यापुर्वी पीडित मुलीने खलाटे याचा मोबाईल ब्लॉक केला, म्हणुन त्याने बारामती येथे कॉलेजवर येवुन पीडित मुलीचा मोबाईल हिसकावुन घेवुन, तो जमीनीवर आपटुन मोबाईल चे नुकसान केले असल्याची फिर्याद देण्यात आली असून, त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गौरव ऊर्फ सचिन नितीन खलाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.
No comments