सार्वजनिक गणेशोत्सव नियोजनाबाबत दि.८ रोजी आढावा बैठक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२३ सर्वत्र दिनांक १९/०९/२०२३ ते २८/०९/२०२३ अखेर साजरा होत आहे. तथापि फलटण तालुक्यात सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था व तद्अनुषंगिक इतर काही अनुचित प्रकार घडू नये व गणेशोत्सव कालावधीत करावयाचे नियोजनाचे दृष्टीने उपविभागीय दंडाधिकारी फलटण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक ०८/०९/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता दरबार हॉल, अधिकार गृह फलटण येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
No comments