Breaking News

जालना घटनेस जबाबदार असणाऱ्यांना निलंबित करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

Sambhaji Brigade demands suspension of those responsible for Jalna incident

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)जालना येथे झालेल्या मराठा समाजवरच्या लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त करून, या घटनेला जे जबाबदार असतील त्यांना निलंबित करण्यात यावे व मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेड फलटणच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे सातारा  जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, प्रदीप घाडगे, किशोर शिंदे, मंगेश गायकवाड, बजरंग भगत, सुबोध शिर्के, बाबुराव जगताप उपस्थित होते.

    संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना येथे मराठा समाजाच्या वतीने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार समाज बांधव आंदोलन आमरण उपोषण करत होते. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी शासनाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी येऊन आंदोलन पाठीमागे घ्या सांगत होते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर मराठा समाजातील महिला पुरुष तरुण-तरुणी यांच्यावरती जणूकाही अतिरेकी असल्याप्रमाणे लाठी चार्ज करून, अमानुष हल्ला चढवला, याबाबत राज्याचे मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आपण जे कोणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी अशाप्रकारे वागत आहे, त्यांची चौकशी करून, त्यांना तात्काळ निलंबित करावे व मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मराठा समाज पुन्हा एकदा अतिशय तीव्र स्वरूपाचे रस्त्यावरील आंदोलन करताना पुढील काळात दिसेल याची राज्याचे प्रमुख म्हणून नोंद घ्यावी.

No comments