आनंदाचा शिधा वितरणामध्ये सातारा जिल्हा राज्यात प्रथम
सातारा - राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. सातारा जिल्ह्यने ९७.४४ टक्के वितरण करुन आनंदाचा शिधा वितरणामध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे .
सातारा जिल्ह्यात तीन दिवस नेट सुविधा बंद असतानाही सर्व पुरवठा विभाग अधिकारी , प्रांताधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आनंदाचा शिधा वितरणामध्ये 97.44 % वितरणासह राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
सातारा जिल्ह्यात तीन लाख 88 हजार 907 पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी तीन लाख 78 हजार 934 शिधापत्रिकाधारक कुटूंबाना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने 97.37% तर गोंदिया जिल्ह्याने 96.53% वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.
No comments